जीवधन, नाणेघाटात तीन हेक्टर क्षेत्रात पाच किलो बियांचे रोपण  

दत्ता म्हसकर
सोमवार, 10 जून 2019

जुन्नर : येथील ऐतिहासिक किल्ले जीवधन व नाणेघाट परीसरातील तीन हेक्टर क्षेत्रात पाच किलो बियांचे रोपण रविवारी (ता.9) करण्यात आले. बियांचे रोपण केल्यानंतर अवघ्या दोन तासांत नाणेघाट परीसरात पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे रोपण केलेल्या बियांची उगवण होईल असा विश्वास आलेल्या पर्यटकांनी व्यक्त केला. 

निसर्गरम्य जुन्नर तालुका परिवाराच्या नगर, कल्याण, सातारा, लातुर, पुणे व नाशिक जिल्ह्यातील सुमारे साठ पर्यटकांनी हा उपक्रम राबविला. यात विविध बारा प्रजातींच्या वृक्षांच्या बियांचे रोपण करण्यात आले. येथील प्लॅस्टिक गोळा करून हा परिसर प्लॅस्टिक मुक्त करण्यात आला. माजी सैनिक रमेश खरमाळे  निसर्गरम्य जुन्नर तालुका व सह्याद्रीचे सौंदर्य ग्रुपच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा उपक्रम राबवत आहेत. त्यांना विनायक साळुंके, प्रविण खरमाळे, स्वाती खरमाळे व विशाल बो-हाडे यांचे सहकार्य लाभले. आहेत.

खरमाळे दर वर्षी पावसाळ्यापूर्वी जुन्नर तालुक्यातील विविध ठिकाणी निःशुल्क ट्रेक, बिया रोपण, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबवित आहेत. पर्यटकांना किल्ले, पर्यावरणाचे मानवीय जीवनातील महत्त्व, ट्रेक का ? व कशासाठी?,जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा याबाबत मार्गदर्शन करतात. बिया रोपणानंतर किल्ले जीवधन कल्याण दरवाजा, जीवाईदेवी, धान्यकोठार, जुन्नर दरवाजा मार्गे वानर लिंंगी असा ट्रेक करत उपक्रमाची सांगता करण्यात आली.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Planted 5 kg seedlings In Jivdhan and Naneghats Three Hectare area