पुढील महिन्यात शंभर हेक्टरवर दिड लाख रोपांची होणार लागवड

जनार्दन दांडगे
सोमवार, 3 जून 2019

लोणी काळभोर : राज्यात वन विभागाच्या वतीने पुढील महिन्यात राबविण्यात येणाऱ्या तेहतीस कोटी वृक्ष लागवड योजने अतर्गतदिड लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. 

लोणी काळभोर, वडकी मोहमंदवाडी, खेड-शिवापुर, आळंदी म्हातोबाची, लोहगाव, निरगुडी, वडगावशेरी आदी गावातील शंभर हेक्टरवर अस्सल भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी थेऊर येथील मुळा मुठा नदीतीरावरील वन विभागाच्या रोपवाटीकेत अस्सल भारतीय प्रजातीच्या विविध झांडाची सुमारे सव्वातील लाख रोपे तयार ठेवण्यात असल्याची माहिती वन विभागाचे थेऊर (ता. हवेली) येथील नियतक्षेत्र अधिकारी रवी मगर यांनी दिली. 

लोकसहभागातून पर्यावरणाचा विकास असा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन, राज्यात वन विभागाच्या वतीने पुढील महिन्यात तेहतीस कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहीमेअंतर्गत थेऊर येथील मुळा मुठा नदीतीरावरील वन विभागाच्या रोपवाटीकेत सव्वातीन लाखाहुन अधिक अस्सल भारतीय प्रजातीची रोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत. 

याबाबत अधिक माहिती देतांना वन विभागाचे नियतक्षेत्र अधिकारी रवी मगर म्हणाले, वन विभागाच्या वतीने चालु वर्षी राज्य भऱात तेहतीस कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले असुन, १ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वन विभागाच्या थेऊर येथील रोपवाटीकेमध्ये लिंब, आवळा, साधी व विलायती चिंच, करंज, जांभूळ, शिदोंडी व टॉरटालीस बाभळ खैर, शिसु, आपटा, बहावा, अडळसा, गुळवेल, बांबू, पळस, भावा, शिसू, सीताफळ आदी अस्सल भारतीय प्रजातीची रोपे तयार करण्यात आली आहेत.

 यातील दिड लाख रोपे ही वडकी, लोणी काळभोर, महमंदवाडी, खेड - शिवापुर, आळंदी म्हातोबाची, लोहगाव, निरगुडी, वडगाव शेरी गावातील वन विभागाच्या जागेत लावण्यात येणार आहेत. तर उर्वरीत रोपे ही त्या भागातील शाळा व ग्रामपंचायत, सैन्यदल, पोलीसदल, आरोग्य विभागासह शासनाच्या विविध प्रशासकीय यंत्रणाच्या मागणीनुसार त्यांना रोपवाटीकेच्या माध्यमातुन ही रोपे मोफत देण्यात येणार आहेत. 

नागरीकांचे सहकार्य हवे

याबद्दल अधिक बोलतांना रवी मगर म्हणाले, चालु वर्षी जुलै महिण्याच्या पहिल्या आठवड्यापासुन वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे. हवेलीच्या पुर्व भागात अधिकाअधिक वृक्ष लागवड व्हावी यादृष्ट्रीने प्रयत्न सुरु करण्यात आले असुन, लोणी काळभोर, आळंदी म्हातोबाचीसह पुर्व हवेलीत विवि्ध ठिकाणी वृक्ष रोपण करण्यासाठी शाळा, ग्रामपंचायतीसह विविध सामाजीक संस्थेना प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज असुन, या कामासाठी नागरीकांनीही पुढे येण्याची गरज आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Planting one and a half lakh saplings on 100 hectares next month