कापडी पिशव्यांसह रद्दीलाही भाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पुणे - बंदीमुळे प्लॅस्टिक पिशव्या हद्दपार होऊ लागल्या असून, कापडी पिशव्यांबरोबरच पेपरची रद्दी भाव खाऊ लागली आहे. प्लॅस्टिक बंदी करताना सरकारने पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांनी स्वतःच कापडी आणि कागदी पिशव्यांचा पर्याय शोधला आहे. 

सरकारने शनिवारी प्लॅस्टिक बंदीची घोषणा केली. शहरात महापालिकेने या बंदीची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे कापडी पिशव्यांच्या मागणीत तीन ते चार पटीने वाढ  झाली. 

बाजारातील प्लॅस्टिक पिशव्या बंद झाल्या, मात्र पर्याय उपलब्ध नसल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कागदी पिशव्यांच्या किमतीत किलोमागे वीस रुपयांनी वाढ झाली आहे. कापडी पिशवीमागे दहा रुपयांनी वाढ झाली  आहे. 

पिशव्यांना मागणी नव्हती; पण शनिवारपासून या पिशव्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. अगोदर दिवसाला पंधरा ते वीस पिशव्या विकल्या जात होत्या. मात्र आज पन्नास ते साठ पिशव्या विकल्या आहेत. पिशव्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. 
- पांडुरंग माने, विक्रेते 

Web Title: plastic ban cloth bags