#PlasticBan पिंपरीत ९० हजारांच्या प्‍लॅस्‍टिक पिशव्या जप्‍त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

पिंपरी - प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारपासून  (ता. २३) महापालिकेच्या वतीने १८ दुकानदारांवर कारवाई करून ९० हजार रुपये किमतीच्या १७४ किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या, वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

राज्य सरकारने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक वस्तू, पिशव्यांवर आज (ता. २३) पासून कारवाई होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये कापडी आणि कागदी पिशव्या खरेदीसाठी गर्दी केली होती. प्लॅस्टिकबंदी लागू होणार असल्याने जे दुकानदार अगदी कालपर्यंत (ता. २२) बंदी असलेले प्लॅस्टिकचे ग्लास, पिशव्या वापरत होते, त्यांनी कारवाईच्या भीतीने त्यांचा वापर बंद केला. 

Web Title: Plastic Ban crime Pimpri

टॅग्स