प्लॅस्टिकमुक्त शहरास आजपासून प्रारंभ 

plastic
plastic

पिंपरी - प्लॅस्टिक वापर व विल्हेवाटीच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी शहरात बुधवारी (ता. २) एकदाच वापरलेल्या प्लॅस्टिकचे संकलन करण्यात येणार आहे. यासाठी क्षेत्रीय स्तरावर संकलन केंद्रांची सोय करण्यात आली आहे. येथे नागरिकांनी प्लॅस्टिक जमा करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले आहे. 

केंद्र सरकारच्या सूचनांनुसार शहरात ११ सप्टेंबर ते २७ ऑक्‍टोबरदरम्यान प्लॅस्टिक बंदी जनजागृती, श्रमदान व प्लॅस्टिकमुक्त दिवाळी असे तीन टप्पे राबविण्यात येणार आहे. नागरिक, संघटना, संस्था, शाळा, क्रीडा संकुल, क्‍लब, चित्रपट व नाट्यगृहे, औद्योगिक संस्था, सरकारी / निमसरकारी/ खासगी कार्यालये, धार्मिक संस्था, हॉटेल, दुकानदार, मॉल, विक्रेता, केटरर्स, व्यापारी, फेरीवाला, वितरक, वाहतूकदार, सेल्समन, मंडई व उत्पादकांनी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत संकलन केंद्रात प्लॅस्टिक जमा कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संकलन केंद्रे 
‘अ क्षेत्रीय कार्यालय
  भेळ चौक, निगडी- प्राधिकरण 
  पिंपरी भाजी मंडई
  पिंपरी कॅम्प
  मयूर ट्रेड सेंटरजवळ, चिंचवडस्टेशन 
  रोटरी क्‍लबशेजारी, संभाजीनगर
  आकुर्डी मुख्य रस्ता
  बंटी ग्रुपजवळ, मुख्य रस्ता, आकुर्डी 

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
  काळेवाडी मनपा दवाखाना, सह्याद्री बाजार, काळेवाडी 
  शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी
  गांधीपेठ, चिंचवड, चाफेकर चौक
  डी मार्ट, रावेत, पीसीएनटीडीए, रावेत 

‘क’ क्षेत्रीय कार्यालय
  हॉकी स्टेडियमशेजारी, नेहरूनगर
  कृषी उत्पन्न बाजार समिती, मोशी
  रसरंग चौक, मासुळकर कॉलनी

‘ड’ क्षेत्रीय कार्यालय
  औंध-रावेत रस्ता, रहाटणी
  मोर रिटेल शॉपिंग सेंटर, रहाटणी रोड, पिंपळे सौदागर
  पिंपळे गुरव, आरोग्य निरीक्षक कार्यालय
  वाकड आरोग्य निरीक्षक कार्यालय, वाकड गावठाण

‘इ’ क्षेत्रीय कार्यालय
  ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय, पांजरपोळ संस्थेसमोर, नाशिक रोड, भोसरी 
  संत निरंकारी भवन, दिघी रोड, सावंतनगर मैदानलगत 
  लांडेवाडी अग्निशामक केंद्र, लांडेवाडी- भोसरी 
  बोपखेल मनपा दवाखाना, बोपखेल गावठाण
  चऱ्होली आरोग्य कार्यालय
  मोशी करसंकलन कार्यालय, मोशी चौक

‘फ’ क्षेत्रीय कार्यालय
  ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाची जुनी इमारत, लोकमान्य टिळक चौक, निगडी 
  कस्तुरी मार्केट, कृष्णानगर, पोलिस वसाहत चौक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com