कवठे येथे प्लॅस्टिक कचरा पेटविला; कारवाईच्या भीतीने अज्ञाताचे कृत्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सध्या प्लॅस्टिक कचरा हा चर्चेचा व संवेदनशील विषय असून, या फेकलेल्या कचऱ्याची माहीती कळूनही, ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाने याकडे ढुंकूनही पाहीले नाही. किंवा पोलिसांत तक्रारही दाखल केली नाही.

कवठे : येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाराजीकच्या सेवारस्त्याच्या बाजूच्या ओढ्यात परवा अज्ञात वाहनातून जवळपास ट्रकभर प्लॅस्टिक कचरा फेकला होता. यामध्ये प्लॅस्टिकच्या बॅगा, पिशव्या होत्या तसेच त्यामध्ये विविध प्रकारचे केमिकल, द्रवपदार्थ त्यातून बाहेर पडून परीसरात मोठी दुर्गंधी व घाण पसरली होती. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. 

याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच होणार दंड व कारवाईच्या भीतीने संबंधिताने सदर प्लॅस्टिक कचरा पेटवून दिला. सध्या प्लॅस्टिक कचरा हा चर्चेचा व संवेदनशील विषय असून, या फेकलेल्या कचऱ्याची माहीती कळूनही, ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाने याकडे ढुंकूनही पाहीले नाही. किंवा पोलिसांत तक्रारही दाखल केली नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत पोलिसही अनभिज्ञ राहीले. त्यामुळे कचरा फेकणाऱ्याने तातडीने हालचाल करुन हा प्लॅस्टिक कचरा पेटवून दिल्याचे दिसून येते. या कचऱ्यामुळे अगोदरच मोठी दुर्गंधी पसरली असताना, कचरा पेटविल्यामुळे परीसरात धुराचे लोट व जळकट वास यामुळे परीसरातील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागला. हा प्लॅस्टिक कचरा येथे कोणी आणून टाकला व पेटविला? याचीच मोठी चर्चा कवठे ग्रामस्थांमध्ये सुरु आहे.         
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plastic garbage burnt at Kavathe