येरवड्यातील रुग्णालयात चक्क प्लॅस्टिकचे उत्पादन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

येरवडा - शहरात प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाईची मोहीम जोरात सुरू असताना यशवंतनगर येथील तलेसरा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर चक्क प्लॅस्टिक उत्पादन सुरू होते. येरवडा पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार बाळासाहेब बहिरट यांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला. येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 40 किलो प्लॅस्टिक व कच्चा माल जप्त केला.

या संदर्भात वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संजय घावट म्हणाले, 'तलेसरा रुग्णालयाच्या इमारतीत कुंदन पॅकेजिंग नावाने प्लॅस्टिक उत्पादन सुरू होते. याची माहिती बहिरट यांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला दिली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी तिरुपती पांचाळ, अनिल डमाळे यांनी उत्पादन केंद्राची पाहणी केली. या वेळी त्या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांना अन्नपदार्थ पार्सल पाठविण्यासाठी असलेले प्लॅस्टिक पॅकेजिंगचे उत्पादन सुरू होते. त्याचा कच्चा मालही होता. हा सर्व माल जप्त करण्यात आला आहे.''

Web Title: plastic production in yerwada hospital