esakal | प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. शिरीष दड्डी यांचे निधन

बोलून बातमी शोधा

shirish daddi

पुण्यातील ज्येष्ठ व निष्णांत प्लास्टिक सर्जन डॉ. शिरीष दड्डी (वय 84) यांचे नुकतेच निधन झाले

प्रख्यात प्लास्टिक सर्जन शिरीष दड्डी यांचे निधन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील ज्येष्ठ व निष्णांत प्लास्टिक सर्जन डॉ. शिरीष दड्डी (वय 84) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी असा परिवार आहे. ससून हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी व भाजलेल्या रुग्णांच्या युनिटचे ते प्रमुख होते. जहांगीर हॉस्पिटलमध्ये देखील ते कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. फोर्ब्ज मार्शल कंपनीच्या मेडिकेअर हॉस्पिटल तसेच डेरवण येथील वालावलकर ट्रस्टच्या सेवाभावी हॉस्पिटलमध्ये त्यांनी आपल्या निष्णांत कौशल्याचे योगदान दिले आहे.

हेही वाचा: "दोन डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका नाहीच ! कोरोना झाल्यानंतरही होत नाही रुग्ण गंभीर'

अनेक रुग्णांवर त्यांनी मायक्रोस्कोप शिवाय मायक्रोसर्जरी केली आहे. जन्मता व्यंग असलेल्या तसेच अपघातानंतर किंवा भाजल्यामुळे विद्रुपता आलेल्या रुग्णांवर कॉस्मेटिक सर्जरी करून त्यांनी रुग्णांना नवे जीवन दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांना लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड दिला आहे. तसेच बीजे मेडिकल कॉलेजच्या रिसर्च सोसायटीने त्यांचा सत्कार केला. मेडिकल कॉलेजमध्ये असताना साध्या खडूमध्ये कोरीवकाम करून त्यांनी अत्यंत सुंदर वस्तू बनविल्या होत्या.