पुणे - पिंपळे सौदागर येथे प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केंद्र

रमेश मोरे
सोमवार, 23 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पिंपळे सौदागर "ड "क्षत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपळे सौदागर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्लस्टिक कचऱ्याचे संकलन केंद्र  सुरू करण्यात आले आहे. 

जुनी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पिंपळे सौदागर "ड "क्षत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपळे सौदागर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्लस्टिक कचऱ्याचे संकलन केंद्र  सुरू करण्यात आले आहे. 

पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात मोर रिटेल शॉपिंग सेंटर येथे सुरू करण्यात आलेल्या या संकलन केंद्रात प्लास्टिक बॅग कचरा, थर्माकोल आदी वस्तूचे संकलन केंद्र सुरू करण्यात येत आहे.नुकतेच या  केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी  आरोग्य अधिकारी विनोद बेंडाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव, आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई, आरोग्य सहाय्यक दिपक माकर पर्यावरण अध्यक्ष विकास पाटील  तसेच आरोग्य कर्मचारी  रामा मंजाळ संतोष कांबळे सिद्धार्थ सातपुते मिलिंद पोत्रे अमित कोष्टी उपस्थित होते.

स्वच्छ व सुंदर पिंपरी चिंचवड मोहीमेतील एक स्तुत्य उपक्रम महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरु केल्याने परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे  स्वागत केले आहे. शासनाने प्लास्टिकचा वापर व साठवणुकीवर अधिसुचना काढून बंदी आणल्याने पर्यावरण व परिसरातील स्वच्छता वाढणार असल्याचे मा.सहाय्यक आरोग्य अधिकारी विनोद बेंडाळे  यांनी यावेळी सांगितले पिंपळे सौदागर नागरिकांनी पुढील काळात आपल्या घरातील प्लास्टिक कचरा व थर्माकोल रस्त्यावर न फेकता संकलन केंद्रात जमा करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यानुसार नागरिकही  या उपक्रमाला प्रतिसाद देत आहेत.

Web Title: plastic waste collection in pimpale saudagar pune