प्लॅस्टिकबंदी अंमलबजावणीविरूद्ध व्यापाऱ्यांचा आज बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पुणे - महापालिकेकडून प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचा आरोप करीत जिल्हा रिटेल व्यापारी संघाने सोमवारी (ता. २५) लाक्षणिक बंद पुकारला आहे. 

उत्पादनावर प्लॅस्टिकचे वेष्टन लावण्यात येते, त्याला पर्याय दिला पाहिजे. व्यापाऱ्यांना यात दोषी धरू नये, अशी भूमिका संघाने घेतली आहे. कायद्याचा बडगा दाखवून व्यापाऱ्यांवर अन्याय करू नये, अशी मागणी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी केली आहे. कारवाईच्या विरोधात संघाची बैठक पार पडली. या बैठकीस उपनगरांतील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मिठाई व्यापाऱ्यांचाही सहभाग
सरकारच्या दुटप्पी धोरणाविरोधात पुणे मिठाई, फरसाण आणि डेअरी असोसिएशनने सोमवारी (ता. २५) एक दिवसाचा बंद पुकारला आहे. मिठाई, फरसाण व डेअरी असोसिएशनचे सचिव अरविंद बुधानी म्हणाले, ‘‘ प्लॅस्टिकबंदी करताना सरकारने पर्याय दिलेला नाही. नियमांमध्ये स्पष्टता नसताना दंडात्मक कारवाई केली जात आहे.’’

Web Title: plasticBan band today against plastic ban enforcement