आता प्लॅस्टिकशिवाय बुके

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

पिंपरी - प्लॅस्टिकबंदीचा फुलांचे उत्पादक, किरकोळ विक्रेत्यांना फटका बसत आहे. बुके करण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर बंद झाल्याने नागरिक भेटवस्तू देण्यास प्राधान्य देत आहेत. 

प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून कारवाई सुरू झाली आहे. फूल व्यवसायात प्लॅस्टिकचा वापर जास्त होता. परंतु, बंदीमुळे व्यापारी, उत्पादक शेतकरी, ग्राहकांना प्लॅस्टिकला अद्याप पर्याय उपलब्ध झाला नाही. अनेकजण कार्यक्रमांसाठी फुलांचे बुके भेट देतात. परंतु, प्लॅस्टिकबंदीमुळे बुकेच्या मागणीत घट झाली आहे.

सोनचाफ्यासारखी फुले १० रुपयांस १० नग या भावाने उपलब्ध असतात. प्लॅस्टिकबंदीमुळे शेतकऱ्यांना ती ७०० ते ८०० रुपये किलोने विकावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे. तसेच, पावसामुळे फुलांचे हार ओले होतात. त्यांना कागदाचे वेष्टण केल्यास ते लगेचच खराब होते.

घाऊक विक्रेत्यांना बंदीचा फारसा फरक पडणार नाही. परंतु, किरकोळ विक्रेत्यांवर परिणाम होत आहे. बुकेसाठी वापरली जाणारी जरबेरा, कार्निशिया फुले नाजूक असतात. प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅकिंग न केल्यास फुलांची पाने गळण्याची शक्‍यता असते. 
- गणेश आहेर, पिंपरी मंडईतील घाऊक आणि किरकोळ विक्रेते

या पूर्वीचा फूलपुडा प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणत होतो. आता तो कागदी पुड्यातून घ्यावा लागतो. 
- अनिता कुलकर्णी, चिंचवड

समारंभासाठी प्लॅस्टिक वापर
मुंबईतील तरुण पिंपरीतील फूलविक्रेत्यांकडे लग्नासाठी मोटार सजविण्यासाठी सोमवारी आला. परंतु, प्रवासात फुले खराब होतील म्हणून प्लॅस्टिक वापराशिवाय पर्याय नाही, असे त्याने सांगितले.

Web Title: plasticBan booky without plastic