esakal | बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे ढोल बजाव आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

baramati1.jpg

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. कोर्ट कॉर्नरपासून पदयात्रेने या आंदोलनाला सुरुवात झाली 

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे ढोल बजाव आंदोलन

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. कोर्ट कॉर्नरपासून पदयात्रेने या आंदोलनाला सुरुवात झाली 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, अण्णासाहेब घोलप यांच्यासह मोठा फौजफाटा उपस्थित होता. ढोल बजाव आंदोलनानंतर मिलिंद मोहिते यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांबाबत विचार न झाल्यास कोरोनाचा विचार न करता यापुढे मोठे आंदोलन मराठा समाजाच्या वतीने उभे केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. 

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मुदतवाढ

सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे तत्काळ अर्ज करून पाच किंवा अधिक न्यायमूर्तींचा समावेश असलेले घटनापीठ किंवा खंडपीठ स्थापनेची विनंती करून आरक्षणाची अंतरिम स्थगिती मागे घेण्यास बाजू मांडावी, स्थगिती उठवली जात नाही तो वर कोणतीही शासकीय भरती करू नये, स्थगिती दिलेल्या निर्णयाच्या दिवसापर्यंत सर्व भरती प्रक्रियेत मराठा उमेदवारांना शासकीय सेवेत तत्काळ सामावून घ्यावे, शैक्षणिक प्रवेशही करून घ्यावेत, अंतिम सुनावणीदरम्यान सरकार व विरोधी पक्ष प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहून मराठा आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांना माहिती देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, सारथीची आर्थिक तरतूद व मनुष्यबळ वाढवून पूर्वीप्रमाणेच ती तरतूद करावी आदी मागण्या उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.