खेळालाही करिअर म्हणून निवडा : पोलिस अधिकारी विजय चौधरी

loni
loni

लोणी काळभोर : खेळात पैसा, प्रसिद्धी, नोकरी, नाव, सन्मान, पुरस्कार सर्व गोष्टी आहेत. मागिल काही वर्षापासून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रेल्वेत, पोलिस खाते, शासकीय तसेच विविध कंपन्यांत नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी व पालकांनी खेळाकडे केवळ मनोरंजनाचे साधन न पहाता करिअर म्हणूनही पाहण्याची गरज आहे. मनातील भीती दूर करा आणि खेळालाही करिअर म्हणून निवडा असे आवाहन ट्रिपल महाराष्ट्र केसरी व परीक्षावधीन उपविभागीय पोलिस अधिकारी विजय चौधरी यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे केले. 

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी हे नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षन अकॅडमी येथून प्रशिक्षण संपवून, नुकतेच पुणे ग्रामीण पोलीस दलात उप अधीक्षक (प्रोबेशनरी पिरियड) या पदावर रुजु झाले आहेत. विजय चौधरी यांनी प्रशिक्षणाचा एक भाग म्हणुन शुक्रवारी (ता. 14) सकाळी लोणी काळभोर पोलिस ठाण्यास भेट दिला. यावेळी लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक क्रांतीतकुमार पाटील व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाडसह पुर्व हवेलीमधील शंभरहुन अधिक मल्ल चौधरी यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी वरील मल्लांशी बोलतांना चौधरी यांनी वरील आवाहन केले. 

यावेळी पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण, श्रीकांत इंगवले, राजेंद्र महानवर, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, गणेश पिंगुवले, चेतन थोरबोले, मोहन तलबार उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना चौधरी म्हणाले, खेळाला केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जात असल्याने, क्रीडा क्षेत्रात करीयर होऊच शकत नाही असा समज बहुसंख्य पालकांचा झालेला आहे. यामुळे पालक मुलांना लहानपणापासूनच खेळापासून दूर ठेवण्‍याचा प्रयत्न करतात. पण आता ही मानसिकता बदलायला हवी. क्रीडा क्षेत्रातही करीयरची उत्तोमात्तम संधी आहेत. किंबहूना याकडे आता करीयर म्हणून पहाण्याची गरज आहे. आपल्याकडे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत ही गुणवत्ता विखुरली आहे. विविध खेळांतील गुणवंत ओळखून त्यांना योग्य ती संधी देणे आणि त्यांना आकार देणे गरजेचे आहे. शासनाकडून विविध योजनांद्वारे तसे प्रयत्न सुरू आहेत. आजही ग्रामीण भागात अपुऱ्या सोयी, सुविधेअभावी अनेक खेळाडूंची कारकीर्दीच्या सुरुवातीलाच अखेर होऊन जाते. त्यासाठी शासनाबरोबरच खासगी कंपन्यांनी खेळांडुना प्रोत्साहन देण्याबरोबरच, खेळाच्या विकासाठी पायाभुत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. 

चौधरी पुढे म्हणाले, लहान मुला-मुलींच्या करिअरचे बहुतेक निर्णय पालक घेताना आढळतात. मात्र, त्यांच्या आवडी-निवडी तपासून त्यांना करिअरची संधी दिली पाहिजे. आज खेळातही मोठे करिअर आहे. सायना नेहवालकडे बघा. तिच्या जन्मापासून ते आतापर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा असाच आहे. सायनाशिवाय, पी. व्ही. सिंधू, तिरंदाज दीपिकाकुमार, टेनिसपटू सानिया मिर्झा अशा किती तरी महिला खेळाडूसुद्धा जग गाजवत आहेत. कुस्तीच्या रिंगणातही महिला खेळाडूंचे प्रमाण कमी नाही. या खेळाडूंच्या पालकांनी मुला-मुलींत भेद केला नाही म्हणउनच भारताला अनेक महिला खेळाडु मिळाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com