पुष्पहार मेणबत्यांऐवेजी वही, पेन द्या

रमेश मोरे
गुरुवार, 29 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी समाजाच्या सर्व स्तरातुन अनुयायी पुष्पहार,फुले व मेणबत्त्या अर्पण करत असतात. या ऐवजी बाबासाहेबांच्या जयंतीदिनी एक पेन व एक वही, देऊन अभिवादन करावे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वही पेन संकलन व वितरण समिती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आले आहे.

समितीच्या वतीने संकलित झालेल्या सर्व वह्या पेन व पुस्तकांचे वाटप ग्रामीण भागातील गरजु शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी,कष्टकरी शेतमजुरांच्या मुलांना याचे वाटप करण्यात येते.यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष असुन मागील दोन वर्षात संकलित झालेले शैक्षणिक साहित्य व वही पेन बीड,उस्मानाबाद,सोलापुर,अहमदनगर,बारामती,पुरंदर,भोर तसेच मावळ व पिंपरी चिंचवड शहरात वाटप करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींना या उपक्रमात सहयोग द्यायचा असेल त्यांनी ९८५०११२५३८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत  समितीचे विलास कांबळे म्हणाले, ग्रामीण भागातील शैक्षणीक परिस्थिती पाहता,आजच्या काळात शहर आणी खेडेगाव अशी दरी निर्माण झाली आहे. येथील विद्यार्थी अनेक सुविधांपासुन वंचित आहे. अर्थकरणाचे गणित जुळत नसल्याने कष्टकरी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी वही पेन पासुन वंचित राहु नये म्हणुन समिती काम करत आहे. बाबासाहेबांना अशा उपक्रमातुनच ख-या अर्थाने अभिवादन करण्याची गरज आहे.

Web Title: please give book, pen instead of candles and flower bukay