दौंड - 'कुणी तालुका कृषी अधिकारी देता का?' 

daund
daund

दौंड (पुणे) : राज्याचे कृषीमंत्री यांच्याकडे सतत मागणी करून देखील रिक्त असलेल्या दौंड तालुका कृषी अधिकारी पदावर कोणाची नियुक्ती होत नसल्याने सत्ताधारी पक्षाचे सहयोगी सदस्य तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्यावर थेट विधानसभेत `कुणी तालुका कृषी अधिकारी देता का? ` म्हणण्याची वेळी आली होती.

मुंबई येथे अर्थसंकल्पीय अनुदानासंबंधी मागण्यांवरील चर्चेच्या दरम्यान आमदार राहुल कुल यांनी शुक्रवारी (ता. १६) ही मागणी केली. जलयुक्त शिवार योजनांतर्गत बांधलेल्या बंधाऱ्याचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून कार्यालयातच १ लाख ८० हजार रूपयांची लाच स्वीकारताना दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल गायकवाड व कृषी पर्यवेक्षक संजय टिळेकर यांना ११ मे २०१७ रोजी अटक झाली होती. तेव्हापासून तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असून कृषी अधिकारी अनिल बोरावके यांच्याकडे दहा महिन्यांपासून तात्पुरता प्रभार आहे.

कार्यालयातील रिक्त पदे व पूर्णवेळ अधिकारी नसल्याने शासकीय योजनांच्या क्रियान्वयन संबंधी अडचणी येत आहेत. काही अधिकारी व कर्मचार्यांकडून  ` फिल्ड ` वर न जाता कार्यालयात बसूनच तयार केल्या जाणार्या पीकपाणी अहवालास वरिष्ठ देखील आक्षेप घेत नसल्याने  `शेतकऱ्यांच्या सेवार्थ` या कृषी विभागाचे ब्रिदवाक्यास तडा जात आहे. त्याचबरोबर गायकवाड व टिळेकर यांच्या अटकेनंतर लाचखोरी देखील शंभर टक्के बंद झालेली नाही.

राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची स्वत : बागायतदार असलेले आमदार राहुल कुल यांनी मागील सहा महिन्यात किमान दहा वेळा भेट घेऊन तालुका कृषी अधिकारी हे रिक्त पद भरण्याची मागणी केली. परंतु त्या बाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने कुल यांना थेट विधानसभा सभागृहात सदर पद भरण्यासंबंधी मागणी करावी लागली. 

दौंड तालुक्याचे क्षेत्र १२८२२९ हेक्टर इतके आहे. राज्यात ८० टक्क्यांपेक्षा अधिक बागायती क्षेत्र असलेला तालुका म्हणून ओळखला जाणार्या दौंड तालुक्यात ऊस लागवडीचे सरासरी क्षेत्र ३१२६१ हेक्टर इतके आहे. तालुक्यात ३ खासगी व १ सहकारी, असे चार साखर कारखाने आहेत. रब्बी हंगामांतर्गत उसाशिवाय असलेल्या पिकाचे क्षेत्र ३८८२९ हेक्टर इतके असून एकूण ६७०८ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिके आहेत. एकूण ३७०६ हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची नोंद आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com