वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद - पूजा राणावत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे - स्वतःवर विश्‍वास ठेवून, कष्ट घेतल्यास यश हे हमखास मिळतं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच प्रशासकीय सेवेत जायचे ध्येय निश्‍चित केलं होतं. मी प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावे, असे वडिलांचे स्वप्नं होतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यात मला यश आल्याचा आनंद सर्वाधिक आहे, अशा शब्दात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पूजा राणावत हिने भावना व्यक्त केल्या. 

पूजाने देशात 258 वा क्रमांक मिळविला आहे. पुण्यात वाढलेल्या पूजाने सेंट ऍन्स शाळेत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात मानसशास्त्र विषयात पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर राज्यशास्त्रात पदव्युत्तर (एम. ए) शिक्षण घेतले. पूजाला "माय पार्लमेंट फेलोशिप' ही मिळालेली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून संसदीय काम आणि त्यातील बारकावे समजल्याचे पूजा सांगते. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे ध्येय तिने निश्‍चित केले होते. राणावत परिवारात खरंतर व्यवसायाची पार्श्‍वभूमी आहे. मात्र, तिने प्रशासकीय सेवा करण्याचे ठरविले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच तिने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. 

पूजा म्हणते, ""मला शाळेत असल्यापासूनच प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा होती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, मी प्रशासकीय सेवेतील अधिकारी व्हावे, असे वडिलांचे स्वप्नं होते. त्यांचे स्वप्नं पूर्ण करण्यात मला यश आल्याचा आनंद आहे. आई-वडिलांनी माझ्यासाठी घेतलेले कष्ट आज सार्थकी लागले.'' 

""आमच्या संपूर्ण परिवारात व्यवसायाची पार्श्‍वभूमी आहे. मारवाडी-जैन समाजात मुली खूप कमी प्रमाणात सरकारी सेवेत आहेत. पूजाने यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आमच्या समाजातील मुलीसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. पूजा आठवीत असल्यापासून मी तिला प्रशासकीय सेवेविषयी सांगायचो. माझं स्वप्नं तिने प्रत्यक्षात आणल्याचा आनंद आहे.'' 
- दिनेश राणावत (पूजाचे वडील) 

Web Title: Pleasure of fulfilling father's dream- Pooja Ranavat