प्लॉट विक्रीच्या नावाखाली फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे - मुळशी येथे प्लॉट विक्री करणाऱ्या कंपनीने ग्राहकांकडून प्लॉटसाठीचे लाखो रुपये घेतले. मात्र, ग्राहकांना प्लॉटचा ताबा न देता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका कंपनीविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी प्रकाश श्रीनिवासाचार्य पुराणिक (वय ५९, रा. पिंपळे सौदागर), अनिल सुधाकर घोंगडे (वय ३९, रा. पिंपळे गुरव) व प्रांजल अहिरे (रा.सांगवी) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून साईरंग डेव्हलपर्स कंपनीचे संचालक आर. के. मलिक यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींना सहा महिन्यात प्लॉटींग केलेली जागा देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर प्रत्येकाकडून पैसेही घेतले. त्यानंतर फिर्यादींनी सातत्याने प्लॉटचा ताबा देण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र त्यांनी सातत्याने टाळाटाळ करून फसवणूक केली.

Web Title: Plot Sailing Cheating Crime