हिंगणे खुर्दमध्ये नाला बूजवून प्लॉटिंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे - सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्दमधील आनंद विहार सोसायटीच्या पाठीमागील भागातील टेकडीवरून येणारा नाला बुजवून प्लॉटिंग पाडण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे. छोट्या-मोठ्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या महापालिकेकडे तक्रार करून देखील त्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार तेथील रहिवाशांनी केली आहे. 

आनंद विहार सोसायटीच्या मागील बाजूस पाचगाव पर्वतीच्या टेकडीजवळून नाला येतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा नाला अस्तित्वात आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हा नाला भराव टाकून बुजवून त्या ठिकाणी प्लॉट पाडण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात त्या परिसरातील रहिवाशांनी महापालिका आणि महसूल खात्याकडे वारंवार तक्रार केली. परंतु काही माननीयांचे हितसंबंध गुंतले असल्यामुळे दखल घेतली जात नसल्याचा दावा काही रहिवाशांनी केला. मध्यंतरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. परंतु कोणतीही कारवाई केली नाही, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे. मुसळधार पाऊस झाला, तर मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे पालिकेने यामध्ये लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
 
Web Title: Plotting the bridges in the Hingna khurda