बालेवाडीत साडेचार किलोच्या सोन्याची लूट

संदीप घिसे
गुरुवार, 29 मार्च 2018

पिंपरी - मुंबईहून साडेचार किलो सोने घेऊन आलेल्या एका सराफाच्या कर्मचाऱ्याला दमदाटी करून लुटण्यात आले. ही घटना गुरूवारी (ता.२८) पहाटे बालेवाडी येथे घडली.

पिंपरी - मुंबईहून साडेचार किलो सोने घेऊन आलेल्या एका सराफाच्या कर्मचाऱ्याला दमदाटी करून लुटण्यात आले. ही घटना गुरूवारी (ता.२८) पहाटे बालेवाडी येथे घडली.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका सराफाच्या कर्मचाऱ्याने मुंबईतील झवेरी बाजार येथील एका सराफाकडून साडेतीन किलोची सोन्याची बिस्किटे घेतली. त्यानंतर दुसऱ्या सराफाकडून आणखीन एक किलो सोन्याची बिस्किटे घेतली. एका खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीने ते बालेवाडी येथे रात्री अकरा वाजताच्या सुमारास उतरले. घरी जाण्यासाठी ते रिक्षात बसले. त्यावेळी रिक्षात तीन अनोळखी व्यक्ती जबरदस्तीने घुसल्या. त्यांनी सराफाच्या कर्मचाऱ्याला दमदाटी करून त्यांच्याकडील साडेचार किलोचे सोने व मोबाईल काढून घेतला. त्यानंतर त्या चोरट्यांनी सराफाच्या कर्मचाऱ्यांला एक तासभर फिरवले व रस्त्यावर सोडून दिले. काही वेळानंतर त्या ठिकाणी आलेल्या अन्य एका रिक्षा चालकाचा मोबाइल कर्मचाऱ्याने विनंती करुन घेतला. या फोनवरुन त्यांनी ही घटना आपल्या घरी व त्यानंतर सराफाला कळवली. 

संबंधित सराफ आणि त्यांचा कर्मचारी हे दोघेही गुरुवारी सकाळी फिर्याद देण्यासाठी हिंजवडी पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला.

Web Title: Plundering of four and a half kg gold in Balewadi