
कोरोना लशीचा जगभर प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे त्यावरील लस केव्हा येणार हा सर्वसामान्य नागरीकापासून एखाद्या देशाच्या प्रमुखाला पडलेला प्रश्न आहे. कोरोनावरील हिच लस अमेरिकेतील ऑक्सफोर्डच्या सहकार्याने पुण्यातील औषध निर्मिती करणारी सीरमरम इन्स्टिट्युट करीत आहे. सध्या ही लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या लशीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार असल्याची काही दिवसांपासून चर्चा होती.
पुणे: कोरोना लशीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी सव्वा चार वाजता मांजरी येथील सीरम इन्स्टिट्युटमध्ये दाखल झाले. त्यानंतर ते इन्स्टिट्युट प्रमुख, संशोधक, वैज्ञानिक यांच्याशी संवाद साधत लस निर्मितीची प्रक्रिया जाणुन घ्यायला प्राधान्य देत आहेत. पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखालील हजारो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोना लशीचा जगभर प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे त्यावरील लस केव्हा येणार हा सर्वसामान्य नागरीकापासून एखाद्या देशाच्या प्रमुखाला पडलेला प्रश्न आहे. कोरोनावरील हिच लस अमेरिकेतील ऑक्सफोर्डच्या सहकार्याने पुण्यातील औषध निर्मिती करणारी सीरमरम इन्स्टिट्युट करीत आहे. सध्या ही लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या लशीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार असल्याची काही दिवसांपासून चर्चा होती. त्यानुसार आज दुपारी 3 वाजुन 50 मिनीटांनी लोहगाव विमानतलावर दाखल झाले. त्यानंतर ते 4 वाजुन 30 मिनीटांनी ते हेलीकॉप्तरद्वारे सिरममध्ये दाखल झाले.
PM Vaccine Centres Visit : मोदींच्या पुणे दौऱ्याकडे जगाचे लक्ष; सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कडक बंदोबस्त
दरम्यान पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान सुरक्षेचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डॉ. शिसवे स्वत: मांजरी येथे शनिवारी सकाळपासून होते. लोहगाव विमानतळ, मांजरी येथील सिरम संस्था आणि लोहगाव ते सिरम या मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सिरममध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तिची पोलिसांकडुन कसुन तपासणी केली जात होती. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव लोहगाव विमानतळ परीसर व मांजरीतील सिरम संस्था परीसरातील दुकाने, पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर या परिसरात फिरण्यास नागरीकांना पोलिसांकडुन मज्जाव करण्यात येत होता.