मोदींच्या दौऱ्यादरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांची धरपकड; आंदोलनं रोखली!

रेल्वे लाईनग्रस्त लोकांच्या मागण्यांसाठी देहूत आज आंदोलन होणार होतं मात्र या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातल्या देहू इथं येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहराला पोलीस छावणीचं स्वरुप आलेलं आहे. पोलिसांनी बंदोबस्त कडक केला असून कसून तपासणी आणि चौकशी सुरू आहे. दरम्यान, याठिकाणी होणारी आंदोलनं रोखण्यासाठी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे. (PM Narendra Modi on Dehu Visit)

PM Narendra Modi
पंतप्रधान येणार देहू नगरीत; मोदींच्या हस्ते होणार मंदिराचं लोकार्पण

पिंपरी चिंचवडमधले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर (Maruti Bhapkar) यांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मारुती भापकर आज रेल्वे लाईनग्रस्तांच्या प्रश्नाप्रकरणी आंदोलन करणार होते. आपण वारंवार पत्र लिहून, मंत्र्यांकडे मागण्या करुनही दखल घेतली नसल्याची तक्रारही त्यांनी केली. त्यामुळे पंतप्रधानांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं भापकर म्हणाले होते.

PM Narendra Modi
'पांडुरंगापेक्षा मोठा मोदींचा फोटो'; पंतप्रधानांचा देहू दौरा वादात

मात्र आंदोलन करण्याआधीच पिंपरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. लोकशाहीत मला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तरीही पोलीस मला आंदोलन करू देत नाहीत, असं सांगत भापकरांनी पोलीस स्टेशनमध्येच लाक्षणिक आंदोलन सुरू केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com