esakal | कृषिविधेयक मंजुरीनंतर, पंतप्रधानांकडून पुण्यातल्या शेतकऱ्यांचं कौतुक 
sakal

बोलून बातमी शोधा

pm narendra modi mann ki baat pune farmers group

पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड मोठे यश मिळवले आहे. हा शेतकऱ्यांचा समूह आहे. पुणे आणि मुंबई मधील शेतकरी स्वतः साप्ताहिक बाजारपेठा चालवत आहेत.

कृषिविधेयक मंजुरीनंतर, पंतप्रधानांकडून पुण्यातल्या शेतकऱ्यांचं कौतुक 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे कौतुक केले. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे 4 हजार 500 शेतकरी त्यांची उत्पादने मध्यस्थांशिवाय ग्राहकांपर्यंत पोचवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आणखी वाचा -  पुण्यात कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुण सापडली

लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकाबद्दल माहिती देताना मोदी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आता त्यांची फळे आणि भाज्या कुठेही कोणाकडेही विकण्याची ताकद आहे. ही शक्ती त्यांच्या प्रगतीचा आधार आहे. आता ही शक्ती देशातील इतर शेतकर्यांीनाही मिळाली आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळं आणि भाजीपाला एपीएमसी कायद्यातून वगळण्यात आलं होतं. या बदलामुळे महाराष्ट्रातील फळ आणि भाजीपाला उत्पादकांची परिस्थिती चांगली झाली आहे. पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड मोठे यश मिळवले आहे. हा शेतकऱ्यांचा समूह आहे. पुणे आणि मुंबई मधील शेतकरी स्वतः साप्ताहिक बाजारपेठा चालवत आहेत. या बाजारात सुमारे ७० गावातील साडेचार हजार शेतकर्यां चा समावेश आहे. ते आपली उत्पादने थेट विकत आहेत. व्यापारी आणि दलालांचा यात समावेश होत नाही. त्यामुळे ग्रामीण तरुण थेट बाजारात शेतमाल विक्रीच्या प्रक्रियेत सहभागी होत आहेत. याचा थेट आर्थिक फायदा शेतकऱ्याना होत आहे. त्यातून ग्रामीण भागातील गावांतील युवकांना रोजगार मिळत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

शेतकऱ्यांवरील बाजार समितीचे निर्बंध हटवल्याने त्यांना फायदा होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावलं आहे. शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 'आत्मनिर्भर भारत' बनवण्यात शेतकऱ्यांची मोठी भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंजूर झालेल्या विधेयकांमुळे अनेक शेतकऱ्यांची पत्रं येत आहेत. मी शेतकरी संघटनांशी बोलतो. ज्यात शेतीमध्ये नवीन पैलू केसे जुळत आहेत. यामुळे शेतीत कसे बदल होत आहेत हे समोर येत आहे. हरयाणाच्या सोनपत जिल्ह्यात कंवर चौहान हे एक शेतकरी. त्यांना आधी बाजार समितीबाहेर आपली फळं आणि भाजीपाला विकण्यात खूप अडचणी येत होत्या. आपली फळं आणि भाजी मंडईच्या बाहेर विकत असताना बऱ्याचदा त्यांची फळं, भाज्या आणि गाड्या जप्त करण्यात आल्या. पण २०१४ मध्ये एपीएमसी कायद्यातून फळे आणि भाज्या हटवण्यात आल्या. याचा त्यांना आणि जवळपासच्या इतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला, असे मोदी यांनी स्पष्ट केले. 

आणखी वाचा - अकाली दलानेही सोडली भाजपची साथ

पंतप्रधान मोदींनी करोना संकटाचाही उल्लेख केला. करोनाने आपल्याला एकत्र आणलं. विखुरलेली कुटुंब एक झाली. कुटुंबात आपलेपणा आणि जिव्हाळा वाढला. संपूर्ण कुटुंब अधिक जवळ आले आहे, असेही त्यांनी सांगितले. आपल्या देशात ऐतिहासिक कथा आणि गोष्टी सांगण्याची एक समृद्ध परंपरा आहे. या कथांमधून भावना आणि संवेदनशील बाजू समोर येते. लहान मुलांना अशा गोष्टी आणि कथा ऐकायला खूप आवडतात. तामिळनाडू, केरळमध्ये कथा सांगण्याची वेगवेळी परंपरा आहे. त्यांना विल्लू पाट असं म्हटलं जातं. संगीत आणि गोष्टींचा आकर्षक मेळ घालून त्या मुलांसमोर मांडल्या जातात. धार्मिक कथा सांगण्याची देशातील परंपरा प्राचीन आहे.

क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांची सोमवारी (ता. 28) जयंती आहे. तिचा संदर्भ देत मोदी यांनी जालियनवाला बागमध्ये निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर १२ वर्षाचा एक मुलगा घटनास्थळी गेला. तेथील नरसंहाराचे दृश्य पाहून तो हादरला. इतकं निर्दय आणि क्रूरपणे नागरिकांना मारलं गेलं. यामुळे तो मुलगा पेटून उठला. त्याने इंग्रजांविरोधात लढण्याची शपथ घेतली. तो मुलगा म्हणजेच भगतसिंग होय. हा प्रेरक इतिहास भारताचा गाभा आहे, असेही त्यांनी नमूद केले.