पुणेकरांनो, मिळकतकर अभय योजना पुन्हा लागू

पुणेकरांनो, मिळकतकर अभय योजना पुन्हा लागू

पुणे -  मिळकतकर थकबाकीच्या दंडात (शास्तिदरात) सवलतीची अभय योजना आता पुन्हा लागू होणार आहे. येत्या १० डिसेंबरपासून ३१ जानेवारी २०२२ पर्यंत दोन टप्प्यांत ही योजना राबविली जाईल. या योजनेतून थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत ७० ते ७५ टक्के सवलत मिळेल. त्यातून पुढील पावणेदोन महिन्यांत अडीचशे कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची महापालिकेला अपेक्षा आहे. 

योजनेच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे १० ते ३१ डिसेंबरपर्यंत थकबाकी भरणाऱ्यांना दंडाच्या रकमेत ७५ टक्के, तर १ ते ३१ जानेवारी या काळात थकबाकी भरल्यास ७० टक्के सवलत असेल, असे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्पष्ट केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मिळकतकराच्या थकबाकीचा आकडा चार हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. तगादा लावूनही थकबाकी वसूल होत नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यातही कोरोनाच्या काळात ही महापालिकेच्या तिजोरीत शंभर-सव्वाशे कोटी रुपये उरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी आणि उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यात आली. त्यानुसार २ ऑक्‍टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात लागू केलेल्या योजनेतून महापालिकेला ३५५ कोटी रुपयांचा जादा महसूल मिळाल्याचे महापालिकेच्या मिळकत विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. योजनेला मुदतवाढ देण्याची पुणेकरांची मागणी होती. त्यानुसार स्थायी समितीपुढे ठेवलेला प्रस्ताव मंजूर केला आहे. 

रासने म्हणाले, ‘‘कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या घटकांसाठी योजना पुन्हा लागू केली आहे. तिचा फायदा घेण्यासाठी थकबाकीदारांनी योजनेत सहभागी व्हावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com