...तरच बदलेल प्रभागाचाही चेहरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नगरसेवकांवर कार्यकर्त्यांकडून उधळण्यात येणाऱ्या स्तुतिसुमनांचे जसे फलक दिसू लागले आहेत, तसेच ज्यांनी कामेच केली नाहीत, अशा मंडळींबाबत दबक्‍या आवाजात नाराजीही व्यक्त होत आहे. शहरातील कोणत्याच प्रभागातील नगरसेवक त्यास अपवाद नाहीत. पाच वर्षांनी पुन्हा निवडणुकीला उभे राहू इच्छिणारे विद्यमान नगरसेवक आता मतदारराजाच्या भेटीगाठी घेऊ लागले आहेत. आरक्षणाच्या नावाखाली राज्यभर मूक मोर्चे निघाले; पण एका मोर्चाला नगरसेवक गेले, तर दुसऱ्याला गेलेच नाहीत, तर मग त्यांना मतदान कशाला करायचे... अशी कुजबूजही सध्या ‘त्या’ प्रभागात फिरल्यावर सहज कानावर पडत आहे.

नगरसेवकांवर कार्यकर्त्यांकडून उधळण्यात येणाऱ्या स्तुतिसुमनांचे जसे फलक दिसू लागले आहेत, तसेच ज्यांनी कामेच केली नाहीत, अशा मंडळींबाबत दबक्‍या आवाजात नाराजीही व्यक्त होत आहे. शहरातील कोणत्याच प्रभागातील नगरसेवक त्यास अपवाद नाहीत. पाच वर्षांनी पुन्हा निवडणुकीला उभे राहू इच्छिणारे विद्यमान नगरसेवक आता मतदारराजाच्या भेटीगाठी घेऊ लागले आहेत. आरक्षणाच्या नावाखाली राज्यभर मूक मोर्चे निघाले; पण एका मोर्चाला नगरसेवक गेले, तर दुसऱ्याला गेलेच नाहीत, तर मग त्यांना मतदान कशाला करायचे... अशी कुजबूजही सध्या ‘त्या’ प्रभागात फिरल्यावर सहज कानावर पडत आहे. आपल्याला तिकीट नाही, तर किमान बायको, मुलगा, मुलगी किंवा नातेवाइकाला मिळावं, यासाठी नगरसेवक पक्षश्रेष्ठींकडे फेऱ्या मारत आहेत. घराणेशाहीचा हा उदो उदो चालल्याने राजकीय पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही असंतोष दिसतोय. उमेदवारीसाठी वेगळ्या पक्षात उड्या मारण्याचे प्रकार वाढू लागले; पण कार्यकर्त्यांचे काय... त्यांचा विचार कोण करणार, असा प्रश्‍न विचारला जातोय. ‘‘कामापुरता त्यांचा वापर होतो. कितीवेळा तोच तोच चेहरा मतदारांनी पाहायचा... आम्हाला पक्ष संधी केव्हा देणार? आम्ही काय फक्त सतरंज्याच उचलत राहायचे काय? मग बंडखोरी केली तर पक्षश्रेष्ठींनी आमच्यावर रोष धरायला नको... म्हणूनच म्हणतो, चेहरा बदला तरच बदलेल प्रभागाचाही चेहरा, अशी आहे विविध कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया.

Web Title: pmc election prabhag