महापालिका देणार रोजगारक्षम प्रशिक्षण - महापौर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

पुणे - ""औपचारिक शिक्षण पूर्ण करू न शकलेल्यांनाही स्वतःच्या पायावार उभे राहता यावे, यासाठी महापालिका रोजगारक्षम कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेणार आहे. महापालिकेच्या शाळांच्या जागा व ऍमिनिटी स्पेस याचा त्यासाठी उपयोग होईल,'' असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. 

राज्य सरकारचा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग, एमएटीए एज्युकेशन, जगन्नाथ राठी व्यावसायिक प्रशिक्षण संस्था, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व यशस्वी ऍकॅडमी फॉर स्किल्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजकता व कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे उपसंचालक चंद्रकांत निनाळे, आमदार मेधा कुलकर्णी, एमपीटीएचे संचालक सदानंद देशपांडे, सोसायटीचे सचिव श्‍यामकांत देशमुख, प्राचार्य श्रीकृष्ण कानिटकर, व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका स्मिता धुमाळे उपस्थित होते. या वेळी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतलेल्या 52 निराधार महिलांना मोफत शिलाई मशिन देण्यात आली. टिळक म्हणाल्या,""केंद्र आणि राज्य सरकारप्रमाणे कौशल्य विकास आणि रोजगारक्षम प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन सन 2020 पर्यंत सर्वांच्या हाताला काम हा महापालिकेच्या प्राधान्यक्रमाचा कार्यक्रम आहे.'' 

Web Title: PMc give skill training