बंद मंडयांतील गाळेवाटप सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे - शहरात विविध ठिकाणी उभारलेल्या मंडयांतील गाळ्यांच्या वितरणाची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. वडगाव शेरी भागातील पुण्यनगरी ओटा मार्केटमधील गाळ्यांचे पथारी व्यावसायिकांना वितरण करण्यात आले असून, सिंहगड रस्त्यावरील सनसिटी भागातील गाळेवाटप प्रक्रिया सुरू आहे. यासाठी नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या आहेत.

दहा वर्षांपासून बंद असलेल्या मंडयांबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिका प्रकाशित करून या प्रश्‍नास वाचा फोडली होती. त्याची दखल घेत महापालिकेने गाळेवाटपास सुरवात केली आहे. 

रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत पथारी व्यावसायिकांचे महापालिकेतर्फे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या  व्यावसायिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. संबंधित जागेवर प्रत्यक्ष व्यवसाय करत नसलेले किंवा जागा दुसऱ्याला चालविण्यास दिलेल्या व्यावसायिकांना समन्स दिली जाणार आहे. त्यानंतरही व्यवसाय सुरू न केल्यास संबंधित व्यावसायिकांना २००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पुढील टप्प्यात संबंधितांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या बिगर परवानाधारक व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

गाळा मिळालेल्या पथारी व्यावसायिकांनी पुन्हा रस्त्यावर व्यवसाय सुरू केल्यास त्यांना समन्स देऊन कारवाई करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग, महापालिका

बंद असणारे गाळे 
मंडई संख्या - ५
गाळे - ११७६
केलेला खर्च  - २७  कोटी

Web Title: PMC has started the process of distributing the shop at different locations in the city