esakal | CoronaVirus : ग्रामीण भागातील नऊ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण; कोरोनामुळे आरोग्य विभागाकडून मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

PMC Health care department take survey 9 lakh family of Rural due to Coronavirus

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण एक हजार 399 ग्रामपंचायती आहे. या ग्रामपंचायतींमध्ये मिळून एक हजार 865 गावे आणि वाड्या-वस्त्या आहेत. या सर्व गावांत मिळून जिल्ह्यात एकूण 15 लाख 45 हजार 965 कुटुंबे असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा स्वयंसेविकांच्या मदतीने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे​

CoronaVirus : ग्रामीण भागातील नऊ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण; कोरोनामुळे आरोग्य विभागाकडून मोहीम

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कुटुंबांच्या सर्वेक्षणात आज अखेर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नऊ लाख 30 हजार 179 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आणखी सहा लाख 15 हजार 786 कुटुंबाचे सर्वेक्षण करणे बाकी राहिले आहे. हे सर्वेक्षणही चालू आहे. आतापर्यंत सर्वेक्षण पूर्ण झालेल्या एकूण कुटुंबांपैकी 89 हजार 685 कुटुंबांचे सर्वेक्षण आशा स्वयंसेविकांनी पूर्ण केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण एक हजार 399 ग्रामपंचायती आहे. या ग्रामपंचायतींमध्ये मिळून एक हजार 865 गावे आणि वाड्या-वस्त्या आहेत. या सर्व गावांत मिळून जिल्ह्यात एकूण 15 लाख 45 हजार 965 कुटुंबे असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा स्वयंसेविकांच्या मदतीने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Corona Virus : पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याचे रिपोर्ट निगेटिव्ह; पुणेकरांना दिलासा!

सर्वेक्षण करण्यात आलेल्या कुटुंबांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.
आंबेगाव - 48 हजार 40, बारामती - 91 हजार 245, भोर - 36 हजार 986, दौंड - 83 हजार 375, हवेली - 1 लाख 53 हजार 770, इंदापूर - 69 हजार 128, जुन्नर - 1 लाख 7 हजार 515, खेड - 74 हजार 665, मावळ - 3 हजार 800, मुळशी - 34 हजार 526, पुरंदर - 51 हजार 378, शिरूर - 85 हजार 72 आणि वेल्हे - नऊ हजार 969.