#PMCIssue सासवड रस्त्यावर अपघातांची मालिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

हडपसर - पुणे-सासवड रस्त्यावर सत्यपुरम सोसायटी ते आयबीएम कंपनीपर्यंतच्या रस्त्यावर रस्ता दुभाजक बसविले आहेत. मात्र त्याला रिफ्लेक्‍टर बसविले नाहीत. रात्रीच्या वेळी अंधारात रस्ता दुभाजकाचे दगड लक्षात येत नसल्याने रोज अपघात होत आहे. तरी प्रशासनाने तातडीने याबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सासवड रस्त्यावर अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांना अचानक समोर येणाऱ्या दुभाजकामुळे चांगलीच कसरत करावी लागते. दुभाजक न दिसल्याने रोजच छोटे-मोठे अपघात होत आहे. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

‘सकाळे’चे वाचक ॲड. अमोल कापरे म्हणाले, की दुभाजक बसविण्याचे काम एसपी इन्फोसिटीच्या सीएसआर फंडातून झाले आहे. त्यांनी या ठिकाणी रिफ्लेक्‍टर बसवावेत, यासाठी हडपसर वाहतूक विभागाला कळविण्यात आले आहे. तसेच हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात येत असल्याने त्यांनी देखील या ठिकाणी रिफ्लेक्‍टर बसविणे गरजेचे आहे. या ठिकाणी त्वरित उपाययोजना न झाल्यास एसपी इन्फोसिटी व राष्ट्रीय महामार्ग या दोघांविरुद्ध दावा दाखल करणार आहे.

नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. संबंधित विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे. लवकरच या ठिकाणी रिफ्लेक्‍टर बसविण्यात येतील
- शब्बीर शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर वाहतूक शाखा.

Web Title: PMC Issue Saswad Road Accident Series