#PMCIssues बेकायदा हॉटेलांवर कारवाई कधी?

PMC Issue
PMC Issue

पुणे - माहिती तंत्रज्ञान उद्योगातील (आयटी) आघाडीच्या कंपन्यांमुळे हिंजवडीबरोबरच लगतच्या औंध आणि बाणेरलाही बरकत आली आहे. वेगाने विस्तार होत असलेल्या या भागाकडे महापालिकेचे पुरेसे लक्ष आहे का, असा प्रश्‍न परिसरातील हॉटेलच्या संख्येवरून निर्माण झाला आहे. सुमारे दहा चौरस किलोमीटरच्या औंधमध्ये ३२ हॉटेल्स असल्याची नोंद महापालिकेच्या लेखी आहे अन्‌ प्रत्यक्षात ही हॉटेल्स मोजली तर, ३५० हून अधिक आहेत. त्यामुळे पाणीपट्टी आणि मिळकत कराचेही महापालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न अक्षरशः बुडत आहे.

महापालिकेच्या पायाभूत सुविधांचा वापर करून व्यवसाय करणाऱ्यांची मोजणी परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. त्यातून हा प्रकार उघड झाला आहे. यातील अनेक हॉटेल बेकायदेशीर आहेत. त्यामुळे घरगुती दराने पाण्याचा वापर करून घरगुतीच दराने  मिळकतकराचा भरणा होत असल्याची ही बाब अधोरेखित झाली आहे. 

हिंजवडीमुळे वाकड, बालेवाडी, बाणेर आणि औंधमध्ये नवनवे गृहप्रकल्प उभारले गेले, वाढती वर्दळ लक्षात घेऊन छोटे-मोठे व्यवसायही सुरू झाले. प्रामुख्याने हॉटेल इंडस्ट्री तितक्‍याच वेगाने वाढली आहे.  पाणी, कचरा, पार्किंग आदी सुविधांचा गैरवापर होऊ लागल्याने स्थानिक लोकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. साईड मार्जिन, पार्किंग शेडमध्येही हॉटेल्स सुरू झाली आहेत. तरीही, महापालिकेने त्याकडे डोळेझाक केली आहे. कारण काही अधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’पूर्ण सोयीसाठी.

बेकायदा नळजोड
या भागात हॉटेल उभारण्यात आले तेव्हाच परवानगीपेक्षा अधिक जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा घेण्यात आला आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात येत नाही. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि व्यावसायिकांचे साटेलाटे असल्याने बेकायदा नळजोड घेतली जातात. त्यामुळे महापालिकेचीही फसवणूक होते.

या हॉटेलमधील कचरा वाहतुकीसाठी महापालिकेचीच वाहने वापरली जातात. या व्यावसायिकांच्या सोयीच्या वेळेत वाहतूक केली जाते. त्यामुळे काही वेळा लोकवस्तीतील कचरा उचलण्याकडेही दुर्लक्ष होते. हॉटेलसमोरील वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा ठरतो.
- राहुल जुनवणे, स्थानिक 

बेकायदा व्यवसायाच्या ठिकाणी तातडीने कारवाई केले जाते. संबंधित मिळकतीचे बांधकाम पाडण्यासाठी बांधकाम खाते आणि अतिक्रमण विभागाकडून एकत्रित कारवाई होते. शोध मोहीम राबवून जिथे तक्रारी आहेत तेथे कार्यवाही होईल.
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com