पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे- संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. वारकऱ्यांसाठी विविध भागांत निवास, पिण्याचे पाणी व आरोग्यासह अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शहरात दोन्ही पालख्यांचे आगमन झाल्यानंतर महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाकडेवाडीत शनिवारी (ता. ७) दुपारी तीन वाजता स्वागत करण्यात येईल. त्यानंतर सोमवारी (ता. ९) सकाळी आठ वाजता महापौरांच्या उपस्थितीत दोन्ही पालख्यांना हडपसर येथे निरोप देण्यात येईल.

महापालिकेच्या हद्दीत आगमन होताच संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे कळस येथे सकाळी अकरा वाजता आणि संत तुकाराम महाराज पालखीचे दुपारी एक वाजता महापौर मुक्ता टिळक स्वागत करतील. पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसह पाणीपुरवठा, विद्युत, घनकचरा व व्यवस्थापन, आरोग्य, अतिक्रमण, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने विविध कामे केली आहेत. वारकऱ्यांच्या विसाव्यासाठी मांडव आणि शाळांमध्ये निवासाची व्यवस्था केली असून जागोजागी स्वच्छतागृहे उभारली आहेत. पालखी मार्गांवरील अडथळे दूर केली असून रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. तसेच विविध भागांतील रस्त्यांची डागडुजी केली आहे. 

नागरिकांना सहकार्याचे आवाहन
पालख्यांचा मुक्काम असल्याने नाना पेठ आणि भवानी पेठेत विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. पुढील चार दिवसांत सर्वत्र स्वच्छतेची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. या काळात नागरिकांनी (०२०-२५५०१२६९/०११३०) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे नमूद केले आहे. 

Web Title: PMC for the reception of palkhi