तेवीस गावांतील खड्डे बुजविणार

पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर; लवकरच दुरुस्ती करणार
Pune PMC
Pune PMC sakal

पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी प्रशासनाने खास पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Pune News)

शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खोदकामानंतर दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. हे रस्ते पुढील १० दिवसांत दुरुस्त होतील, असे आश्‍वासन प्रशासनाने दिले आहे. दरम्यान, जून महिन्याच्या अखेरीस राज्य सरकारने पुणे ग्रामीणमधील २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या गावांचा पाणी पुरवठा, कचरा, विद्युत व्यवस्था, आरोग्य यासह रस्त्यांची जबाबदारी महापालिकेकडे आली आहे. या ग्रामपंचायती असल्या तरी मोठ्याप्रमाणात बांधकामे झाल्याने गावांचा विस्तार झाला आहे, वाहनांची संख्याही वाढली आहे. या गावांचे नियोजन करणे महापालिकेसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

Pune PMC
महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षाकवच योजनेला वाढ

गावे महापालिका हद्दीत आल्यानंतर महापालिकेकडून त्वरित पायाभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पावसाळ्यामुळे गावांमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, अनेक ठिकाणी कच्चे रस्ते आहेत, तेथे तातडीने डांबरीकरण होणे शक्य नाही. ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, तेथेही नव्याने काम होणार नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी २३ गावे समाविष्ट झाल्यानंतर प्रत्येक विभाग प्रमुखांना गावांमध्ये कोणती कामे प्राधान्याने करावी लागणार आहेत, याचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पथ विभागाने प्रत्येक गावासाठी २० लाख रुपये रस्त्यांच्या कामासाठी मागितले आहेत. तसेच इतर तातडीचे काम लागल्यास त्यासाठीही निधी आवश्‍यक आहे. त्यामुळे आयुक्तांकडून वित्तीय समितीच्या माध्यमातून पाच कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.

Pune PMC
पदवी प्रवेशासाठी CET नाही; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण

या गावांतील रस्ते दुरुस्ती होणार

म्हाळुंगे, सुस, किरकटवाडी, बावधन बुद्रूक, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रूक, नऱ्हे, होळकरवाडी, अवताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळवाडी, नांदोशी, सणसवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी व वाघोली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २३ गावांसाठी तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये ३०, १८, १५ व १२ मीटर रुंदीचे रस्ते प्रस्तावित आहेत. लहान प्लॉट धारकांचा विचार करून कमी रुंदीचे रस्तेही असायला हवेत. तसेच रस्त्यांच्या कामांना विशेष प्राधान्य देण्याची गरज आहे.

- नरेंद्र हगवणे (आर्किटेक्ट), ग्रामस्थ, किरकटवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com