दहावीच्या शिकवणीसाठी दहा हजारांची मदत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

पुणे - इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या खासगी शिकवणीसाठी आता सरसकट पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे. शहरातील सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. त्यावर येत्या मंगळवारी (ता. 10) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. 

पुणे - इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या खासगी शिकवणीसाठी आता सरसकट पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे. शहरातील सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. त्यावर येत्या मंगळवारी (ता. 10) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. 

महापालिकेच्या हद्दीतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समाज विकास विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, नववी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दहावीसाठी खासगी शिकवणी घेता येत नाही. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे समाज विकास विभागाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या नववीतील विद्यार्थ्यांना 2 ते 5 हजार रुपये दिले जातात. त्यात खुल्या गटासाठी दोन आणि मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात येतात. अशा योजनांसाठी विशेष तरतूद केली जाते. दरम्यान, यासंदर्भात महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे अभिप्राय पाठविला आहे. 

सर्व गटातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरसकट पाच हजारांची मदत देण्याचा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी भोसले आणि नगरसेविका मुक्ता जगताप यांनी दिला होता. त्यावर चर्चा करून समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली आहे. तो आता स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. 

शहरातील शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे, यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत केली जाते. या संदर्भातील योजनेच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊ; पण आधी सर्व पातळ्यांवर चर्चा केली जाईल. 
- योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती 

नववीतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेत काही किरकोळ बदल अपेक्षित आहेत. ते झाल्यास सर्व विद्यार्थ्यांना एकसारखी आर्थिक मदत मिळेल. 
राणी भोसले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती 

Web Title: PMC scheme Ten thousand help for private class