Pune Wall Collapse : महापालिका, कोंढव्यातील घटनेच्या पुनर्वृतीची वाट पाहतेय का?

pune.jpg
pune.jpg

पुणे : कोढव्यात झालेल्या प्रकारनंतर पुण्यात सोसायटीधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सोसायटीच्या सीमा भिंतीच्या सुरक्षिततेबाबत सोसायटीधारकांना चिंता वाटत आहे.
हांडेवाडी रस्ता परिसरातील रविपार्क सोसायटी जवळ रेल्वे भुयारी मार्गा करिता रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सय्यद नगर, काळे पडळ येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.परंतु, हे काम करताना महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून पुरेशी खबरदारी घेण्यात आलेली नाही. या खोदकामामुळे रविपार्क सोसायटीची भिंत पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिथं इलेक्ट्रिक खांब आहे, तो पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विजेची तार तुटून अपघाताचा धोका संभवतो.

कोंढव्यात कोसळेल्या सीमा भिंतच्या घटनेचा धडा घेऊन आता तरी  महानगरपालिकेने तात्काळ सीमा भिंतीस सुरक्षा भिंत बांधावी अशी मागणी सोसायटीधारकांनी केली आहे. 'फोश' चे अध्यक्ष वैभव माने पाटील यांनी याबाबत महापालिकेला तक्रार पत्र (ता.7 जून 2019) दिले. स्थानिक नगरसेवक आमदारांना या गंभीर परिस्थिती बद्दल माहिती दिली.

महापालिकेच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा केली. परंतु, त्याने याबाबत दिलेले उत्तर तर्कशून्य व न पटणारे होते.सोसायटीची भिंत पडून अपघात होण्याची वाट पाहू नका, भुयारी मार्गाचे उद्घाटन होण्यापूर्वी सोसायटी सीमा भिंतीला संरक्षक भिंत बांधा, नाहीतर महापालिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा 'फोश' संघटनेचे अध्यक्ष वैभव माने पाटील यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com