दोन दिवसांत उन्हाचा चटका कमी होणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पुणे - शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून होणारा उन्हाचा चटका कमी होण्याची शक्‍यता हवामान खात्याने बुधवारी (ता. 8) वर्तविली. शहरात पुढील चोविस तासांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असा अंदाजही खात्याने दिला आहे. 

उत्तर पाकिस्तान आणि जम्मू-काश्‍मीरच्या परिसरात वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे. ते दक्षिणेला सरकत आहेत. त्याच वेळी हरियाना, ईशान्य राजस्थानच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. याचा परिणाम विदर्भापर्यंत जाणवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या तुरळक भागात पावसाच्या हलक्‍या सरी पडतील. काश्‍मीर, दिल्ली, पंजाब, हरियाना, चंडिगड येथे पुढील चोवीस तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. उत्तरेत बदललेल्या या वातावरणाचा परिणाम पुणे आणि परिसरावर होण्याची शक्‍यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि मराठवाड्यातील दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी होणार आहे. शहर आणि परिसरातही तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी होईल. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पस्तीशीपर्यंत गेलेला कमाल तापमानाचा पारा 30 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, अशी माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: pmc weather