महापालिकेची सौर ऊर्जा 3.62 रुपये दराने खरेदी करणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - महापालिकेच्या मालकीच्या विविध इमारतींवर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पातून प्रतियुनिट 3 रुपये 62 पैसे दराने वीजखरेदी केली जाणार आहे. या प्रकल्पांमुळे महापालिकेची दरवर्षी सुमारे 19 लाख रुपयांची बचत होणार आहे. 

महापालिकेच्या बालगंधर्व रंग मंदिर, घोले रोड आर्ट गॅलरी, नायडू रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय या मिळकतींच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभे केला जाणार आहे. या प्रकल्पातून दरमहा सुमारे 26 हजार 460 युनिट इतकी वीजनिर्मिती होईल. यामुळे वीजबिलाच्या खर्चात बचत होणार आहे. हे प्रकल्प महाराष्ट्र रेस्को रुफ टॉप सोलर प्रा. लि. यांच्याकडून केला जाईल. हा प्रकल्प उभारणीचा खर्च संबंधित संस्था करणार असून, महापालिकेचा एक रुपया खर्च होणार नाही. केवळ छताच्या जागेचा वापर ती संस्था करणार आहे. त्यांच्याकडून ही वीजखरेदी करण्यासाठी करार करावा, प्रत्यक्ष वीजनिर्मितीनुसार प्रतियुनिट 3 रुपये 62 पैसे दराने वीजबिल देण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे. 

Web Title: PMC will purchase solar energy at the rate of Rs 3.62