महापालिकेकडे तेरा दिवसांत १०५ कोटी कर जमा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

पुणे - नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तेरा दिवसांत महापालिकेकडे सुमारे १०५ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला असून, येत्या ३१ मेपर्यंत कर भरणाऱ्या मिळकतधारकांना करात पाच ते दहा टक्के सवलत देण्यात येत आहे. तसेच, कराची पूर्ण रक्कम भरणाऱ्या निवासी मिळकतधारकांना अपघात विमा योजनेचाही लाभ मिळणार आहे. 

आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या मिळकतकर विभागातर्फे शहरातील मिळकतधारकांना पोस्टाने बिले पाठविण्यात येतात. त्यानुसार यंदा सुमारे साडेआठ लाख मिळकतधारकांना ही बिले पाठविली असून, त्यात पहिल्या टप्प्यात ५ लाख ५० आणि दुसऱ्या टप्प्यात ३ लाख बिले पाठविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, ही बिले परत येऊ नयेत, यासाठी संबंधित मिळकतधारकांचे मेल आयडी आणि दूरध्वनी क्रमांकही पोस्टाकडे देण्यात आले आहेत. ज्यामुळे बिले परत येणार नाहीत. 

दरम्यान, नवे आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत १०५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यात १ लाख १९ हजार मिळकतधारकांनी कर भरला आहे. महापालिकेच्या मिळकतकर विभागासह ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सोय असल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.

Web Title: PMChas deposited 105 crore tax in 13 days