#PMCIssues महापालिकेकडून उपाययोजना सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

पुणे - महापालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील पाण्याच्या टाकीची दुरवस्था, तिच्या आवारातील अस्वच्छता आणि नागरिकांचा वावर रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे. लोकवस्तीतून वाहून येणारे सांडपाणी थांबविण्यात आले असून, टाकीच्या आवारात नियमित स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने सफाई कामगारांची नेमणूक केली आहे, तर नागरिकांना बेकायदा प्रवेश करता येऊ नये, याकरिताही सीमाभिंतीची दुरुस्ती करण्यात आली. येथील दुरवस्थेकडे छायाचित्रांच्या माध्यमातून ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामे करण्याची सूचना केली.

पुणे - महापालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील पाण्याच्या टाकीची दुरवस्था, तिच्या आवारातील अस्वच्छता आणि नागरिकांचा वावर रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे. लोकवस्तीतून वाहून येणारे सांडपाणी थांबविण्यात आले असून, टाकीच्या आवारात नियमित स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने सफाई कामगारांची नेमणूक केली आहे, तर नागरिकांना बेकायदा प्रवेश करता येऊ नये, याकरिताही सीमाभिंतीची दुरुस्ती करण्यात आली. येथील दुरवस्थेकडे छायाचित्रांच्या माध्यमातून ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामे करण्याची सूचना केली. त्यानंतर ही कामे करण्यात येत आहेत.

Web Title: #PMCIssues implemented start from the Municipal Corporation

फोटो गॅलरी