दिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या. 

पुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या. 

शहराच्या वेगवेगळ्या भागांत मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासूनच बस बंद पडत गेल्या. त्यात पीएमपीच्या 50 तर खासगी ठेकेदारांच्या 90 बसचा समावेश आहे. त्यामुळे अनेक मार्गांवरील बसच्या वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. याबाबत विचारणा केल्यावर, कंत्राटदारांच्या बसच्या देखभाल दुरुस्तीच्या समस्या वाढल्या आहेत. त्यांच्या बस नव्या असूनही त्या मोठ्या संख्येने बंद पडत आहेत, असे सांगण्यात आले. पीएमपीच्या 400 बसचे आयुर्मान 12 वर्षांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यातील 100 बस नुकत्याच बाद करण्यात आल्या आहेत. मात्र, आयुर्मान संपलेल्या बस दुरुस्त करून चालविण्यावर मर्यादा येत आहेत, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

मंगळवारी सकाळी व सायंकाळी ऐन रहदारीच्या वेळी कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौक, कर्वेनगर येथील राजाराम पूल, पौड फाटा, स्वारगेट येथील जेधे चौक, डेक्कन येथील खंडुजीबाबा चौक, शिवाजीनगर येथील शिवाजी पुतळा चौक, बाजीराव रस्त्यावर दक्षिणमुखी मारुती मंदिर या ठिकाणी ऐन रहदारीच्या वेळी पीएमपीएल बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली. 

Web Title: pmp 140 buses were closed