पीएमपीच्या 50 मिडीबस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, जवळच्या अंतरासाठी आणि अरुंद रस्त्यांवर त्या उपयुक्त ठरत आहेत. निगडी डेपोने निगडी ते हिंजवडी या मार्गावर महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू केली आहे.

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, जवळच्या अंतरासाठी आणि अरुंद रस्त्यांवर त्या उपयुक्त ठरत आहेत. निगडी डेपोने निगडी ते हिंजवडी या मार्गावर महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू केली आहे.

शहरात पीएमपीचे पिंपरी (नेहरुनगर), भोसरी (सद्‌गुरुनगर) आणि निगडी (भक्तिशक्ती) हे डेपो आहेत. त्या माध्यमातून आणि पुण्यातील न. ता. वाडी (शिवाजीनगर), स्वारगेट, कात्रज, पुणे स्टेशन, कोथरूड, वारजे माळवाडी, हडपसर, मार्केट यार्ड या डेपोंद्वारे शहरातील मुख्य रस्त्यांवर बस सेवा सुरू आहे. आता मिडीबसमुळे अंतर्गत मार्गांवरील बसगाड्यांची संख्या वाढली आहे. काही नवीन मार्ग पीएमपीने सुरू केले आहेत. यामध्ये निगडी डेपोअंतर्गत निगडी-कामशेत, निगडी-वासुली (चाकण एमआयडीसी) आणि निगडी-साईनगर (मामुर्डी) आणि भोसरी डेपोअंतर्गत चाकण-वडगाव मावळ व भोसरी-चऱ्होली या मार्गांचा समावेश आहे. तसेच, काही महिन्यांपूर्वी बंद केलेली आळंदी-जांभेगाव बस पुन्हा सुरू केल्याचे पीएमपीच्या सूत्रांनी सांगितले.  

डेपोनिहाय मिडीबस मार्ग
* पिंपरी डेपो - पिंपरी रोड-डांगे चौक-पिंपरी रोड वर्तुळ मार्ग, पिंपळे निलख-आळंदी, पिंपरी रोड-हिंजवडी, वायसीएम हॉस्पिटल-आळंदी, पिंपरीगाव-भोसरी, रहाटणी-भोसरी.

* निगडी डेपो - निगडी-हिंजवडी (महिला स्पेशल), आकुर्डी स्टेशन-निगडी, चिंचवडगाव-वाल्हेकरवाडी, निगडी-म्हाळुंगेगाव, घरकुल-पिंपरीगाव, निगडी-चऱ्होली, निगडी-आदर्शनगर (किवळे), निगडी-भोसरी, निगडी-कामशेत, निगडी-वासुली, निगडी-साईनगर.

* भोसरी डेपो - भोसरी-पुणे महापालिका, आळंदी-देहू, भोसरी-आळंदी, इंद्रायणीनगर-पुणे स्टेशन, चाकण-वडगाव मावळ, पिंपरी-बोराडेवाडी (मोशी), भोसरी-आकुर्डी, भोसरी-चऱ्होली, भोसरी-चिखली, आळंदी-जांभेगाव. 

मी दररोज घरकुल ते पिंपरीगाव बसने प्रवास करते. मिडीबस आरामदायी आहेत. पिंपरी कॅम्पातील गर्दीतील रस्त्यांवर ती फायदेशीर आहे. सकाळी गर्दीच्या वेळी बसच्या फेऱ्या वाढवाव्यात. 
- कविता कोसे, विद्यार्थिनी

Web Title: pmp 50 midibus