पीएमपीमधील 78 कर्मचाऱ्यांच्या बदल्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - पीएमपीमधील कार्यालय अधीक्षक, लिपिक, कनिष्ठ लेखनिक आदी पदांवरील 78 कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासनाने बुधवारी केल्या. या बदल्या सामाईक आहेत. 

पुणे - पीएमपीमधील कार्यालय अधीक्षक, लिपिक, कनिष्ठ लेखनिक आदी पदांवरील 78 कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासनाने बुधवारी केल्या. या बदल्या सामाईक आहेत. 

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सुमारे पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या दोन महिन्यांपूर्वी बदल्या केल्या होत्या. मात्र, त्या गैरसोयीच्या असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे या बदल्या रद्द करण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील होते. त्यानुसार सामाईक बदल्या झाल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादी पीएमपी कामगार संघटनेचे सरचिटणीस सुनील नलावडे म्हणाले, ""लिपिकांच्या सामाईक बदल्या केल्याबद्दल प्रशासनाचे आम्ही आभार मानतो; परंतु 286 क्‍लिनरच्या बदल्यांबाबतही सहानुभूतिपूर्वक विचार झाल्यास ब्रेकडाऊनचे प्रमाण नक्कीच घटेल.'' 

Web Title: PMP 78 employees Transfer