‘पीएमपी’कडून ‘एमएनजीएल’ला ९ कोटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

जीएसटीचा गोंधळ 
पीएमपीला सीएनजी पुरविताना एमएनजीएलने सुमारे ८ टक्के जीएसटी लावला आहे. नागरिकांना अनुदानित दरात सार्वजनिक वाहतूक सेवा असल्यामुळे जीएसटी लावू नये, असे पीएमपीने एमएनजीएलला कळविले आहे. परंतु, एमएनजीएल त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे.

पुणे - महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) थकबाकीपोटी पीएमपीने नऊ कोटी रुपये गुरुवारी दिले. उर्वरित रकमेबाबत दोन्ही महापालिकांशी चर्चा करणार आहोत, असे पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच पीएमपीची सेवा सुरळीत राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

पीएमपीच्या सुमारे ११४० बस सीएनजीवर धावतात. त्यासाठी एमएनजीएलकडून गॅसचा पुरवठा केला जातो. परंतु, पीएमपीची थकबाकी ४८ कोटी रुपयांवर पोचली आहे. त्यामुळे पुरवठा खंडित करण्याचा इशारा एमएनजीएलने दिला आहे. या बाबत गुंडे म्हणाल्या, ‘‘एमएनजीएलला नऊ कोटी रुपये गुरुवारी देण्यात आले आहेत. उर्वरित रकमेबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल. पीएमपीची सेवा सुरळीत राहणार आहे.’’ पीएमपीने मार्च महिन्यांतही २१ कोटी रुपये एमएनजीएलला दिले आहेत.

Web Title: PMP 9 Crore give to MNGL