पीएमपीचे ब्रेक निकामी 

pmp bus
pmp bus

कात्रज : सातारा रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाले. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत ती बस लोखंडी दुभाजकावर आदळून नियंत्रणात आणल्याने मोठा अपघात टळला. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भारती हॉस्पिटल परिसरात ही घटना घडली. 

कात्रज आगाराची ही बस कात्रजवरून लोहगावकडे जात होती. भारती हॉस्पिटलसमोरील उतारावर आल्यानंतर या बसचे ब्रेक निकामी झाले. ही बाब चालक विष्णू हांडे यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी समोरील वाहन चालकांना ब्रेक 
फेल झाल्याचे ओरडून सांगत बस रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी दुभाजकावर घातली. यामुळे ही बस थांबविण्यात हांडे यांना यश आले आणि मोठा अनर्थ टळला. सकाळची वेळ असल्यामुळे ती प्रवाशांनी भरली होती. या अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने बस मार्गातून बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com