पुणे: नगर रस्त्यावर 'बर्निंग' पीएमपी बसचा थरार

पुणे: नगर रस्त्यावर 'बर्निंग' पीएमपी बसचा थरार

वडगाव शेरी - नगर रस्त्यावर फिनिक्‍स मॉलजवळ पीएमपीच्या बसला शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. येरवडा अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्‍यात आणली. परंतु, या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. 

संबंधित बस चिखली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये पासिंग करण्यासाठी नेण्यात आली होती. पण, बसमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याने ही बस पासिंग चाचणीत अनुत्तीर्ण झाली होती. तेथून येत असताना फिनिक्‍स मॉलजवळ बसने पेट घेतला. ही बस वाहतुकीमध्ये नसल्याने तिच्यामध्ये फक्त चालकच होता. या आगीत बस पूर्ण जळाली असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. 

याबाबत विमाननगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप शिंदे म्हणाले, ""ही बस सीएनजीवर चालणारी होती. नगर रस्त्यावरील फिनिक्‍स मॉलजवळ आली असता बसच्या पुढील भागातून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणातच बसने पेट घेतला. बसचा पुढचा भाग फायबरचा असल्याने आग वाढली. आणि त्यानंतर ती संपूर्ण बसला लागली.'' बस चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली आणि बाहेर उडी मारली. अग्निशामक दलाने पंधरा मिनिटात आग अटोक्‍यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com