पार्किंगचा नियमभंग केल्यास दंड आता पीएमपी चालकाकडून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पुणे - पीएमपीच्या बस संचलनादरम्यान त्या नो पार्किंगच्या ठिकाणी उभ्या केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यामुळे पीएमपीच्या तिजोरीवर आर्थिक भुर्दंड पडतो. मात्र, आता हा दंड संबंधित वाहनचालकाच्या पगारातून वसूल करण्यात यावा, असे आदेश वाहतूक व्यवस्थापकांकडून डेपो स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पीएमपीच्या काही चालकांकडून संचलनादरम्यान मिळणाऱ्या वेळेत नो पार्किंगमध्ये बस उभी केली जाते, डबल पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातो. अशावेळी वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईमध्ये सुमारे पाच हजार दंड लावण्यात येतो. त्यामुळे पीएमपी प्रशासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने हा दंड आता संबंधित चालकाकडून वसूल करण्यात येणार आहे. 

तसेच चालकाने बस उभी करताना पार्किंगच्या ठिकाणीच बस उभी करावी, अशी सूचनाही देण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान बस उभी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: PMP Bus Driver Parking Fine