Video : हिंजवडीत धावत्या पीएमपी बसला आग; जीवितहानी नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

पिंपरी : हिंजवडी येथे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल)  बसला अचानक आग लागली. ही घटना सोमवारी (26 ऑगस्ट) सकाळी आठच्या सुमारास  घडली.

पिंपरी : हिंजवडी येथे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल)  बसला अचानक आग लागली. ही घटना सोमवारी (26 ऑगस्ट) सकाळी आठच्या सुमारास  घडली.

हिंजवडी ते मनपा या मार्गावरील (MH 14, CW 3541 ) या क्रमांकाची बस हिंजवडीतील  राजीव गांधी इन्फोटेक पार्क मधील इन्फोसिस कंपणीच्या सर्कल जवळील रस्त्याने फेज तीनच्या दिशेने जात होती. दरम्यान, बसने अचानक पेट घेतला.

इंजिनमधून मोठ्याप्रमाणात धूर बाहेर पडत होता. चालकाने तातडीने सर्व प्रवाशांना खाली उतरविले. काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या हिंजवडी एमआयडीसी  अग्निशामक दलाच्या पथकाने  आग आटोक्यात आणली. इंजिन मधील बिघाडामुळे आग लागली असावी असा अंदाज चालक शब्बीर पठाण यांनी व्यक्त केला. या घटनेत बसच्या केबिनसह पुढील भागाचे नुकसान झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP bus fires in Hinjewadi