पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला पीएमपी बसने दिली धडक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

ज्ञानेश्‍वर पादुका चौकात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास पीएमपी बसने धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री साडे नऊ वाजता फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर घडली​

पुणे: ज्ञानेश्‍वर पादुका चौकात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास पीएमपी बसने धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री साडे नऊ वाजता फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर घडली

लखन राठोड (रा. यवतमाळ) असे या अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरीकाचे नाव आहे. राठोड हे सोमवारी रात्री साडे साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्‍वर पादुका चौक येथुन जात होते. त्यावेळी वाघोलीकडे जाणारी पीएमपीएल बस (वज्र दोन) ही ज्ञानेश्‍वर पादुका चौकामध्ये थांबली होती. राठोड हे पादचारी मार्गावरुन रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सिग्नल सुटल्याने बसचालकाने बस सुरू करुन ती मॉडर्न महाविद्यालयाच्या दिशेने वळवून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बसच्या समोर आलेले राठोड खाली पडले. त्यावेळी नागरीकांनी आरडाओरडा केल्यानंतर बसचालकाने बस थांबविली. त्यानंतर नागरीकांनी बस मागे ढकलून चाकाखाली अडकलेल्या राठोड यांना बाहेर काढले.

बसच्या चाकाखाली अडकल्याने पादचारी गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP bus hits pedestrian crossing road in Pune