#PmpIssue पीएमपीवर भरवसा ठेवू नका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पौडरस्ता  - मोहिते महाविद्यालयामधील युवकांना खराडीला बुद्धिबळ स्पर्धेसाठी साडेनऊला पोचायचे होते. नेटवर सर्च केल्यावर, सात तीसला वारज्याहून निघणारी बस सात सदतीसला कोथरूड स्टॅंडमार्गे जात असल्याचे दिसले. पौडरस्त्यावरून थेट बस नव्हती. कोथरूड स्टॅंडला चौकशी केली, तेव्हा बसला टाइमटेबल नाही. भरवशावर राहू नका, हे उत्तर ऐकायला मिळाले. तासाभरात अगदी तुडुंब भरलेल्या तीन बस वाघोलीकडे गेल्या; पण खराडीची बस आली नाही. स्थानकावर लावलेल्या पीएमपीएल हेल्पलाइनचा नंबर कोणी उचलत नव्हते. ‘एसएमएस’चेही उत्तर आले नाही. बस गुगलवर असते; पण रस्त्यावर नाही, याचे प्रत्यंतर या युवकांना आले.

पौडरस्ता  - मोहिते महाविद्यालयामधील युवकांना खराडीला बुद्धिबळ स्पर्धेसाठी साडेनऊला पोचायचे होते. नेटवर सर्च केल्यावर, सात तीसला वारज्याहून निघणारी बस सात सदतीसला कोथरूड स्टॅंडमार्गे जात असल्याचे दिसले. पौडरस्त्यावरून थेट बस नव्हती. कोथरूड स्टॅंडला चौकशी केली, तेव्हा बसला टाइमटेबल नाही. भरवशावर राहू नका, हे उत्तर ऐकायला मिळाले. तासाभरात अगदी तुडुंब भरलेल्या तीन बस वाघोलीकडे गेल्या; पण खराडीची बस आली नाही. स्थानकावर लावलेल्या पीएमपीएल हेल्पलाइनचा नंबर कोणी उचलत नव्हते. ‘एसएमएस’चेही उत्तर आले नाही. बस गुगलवर असते; पण रस्त्यावर नाही, याचे प्रत्यंतर या युवकांना आले. अखेर या युवकांनी रिक्षाने खराडी गाठली; पण उशीर झाल्यामुळे त्यांना स्पर्धेत भाग घेता आला नाही. 

याबाबत वारजे डेपोत विचारल्यावर समजले, की खराडीसाठी तीन बसगाड्या आहेत. दोन वाहतुकीसाठी उपलब्ध होत्या. खराडीकडे गेलेली बस वाटेतच बंद पडली. दुसरी वारज्याला पोचलीच नाही.

कोथरूड परिसरातून नगररस्त्याकडे जाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे; परंतु बसगाड्या नाहीत. प्रवाशांची गैरसोय होते. तरुण बसला लटकतात. पण ज्येष्ठांनी, अपंगांनी करायचे काय हा प्रश्‍न आहे. 

भारती पाटील - बसची कोणतीही खात्री देता येत नाही. त्यामुळे मिळेल ती बस घेऊन पुढे जात राहा. हा धडा मला मिळाला. पीएमटी सुधारण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी काहीच कसे करत नाहीत? कसे होईल आमचे पुणे स्मार्ट? 

एम. श्रीनिवासन - वेळेच्या बाबतीत आपले अधिकारी अजिबात गंभीर नाहीत. जग चंद्रावर चालले आहे आणि आम्ही मात्र बसच्या वेळाही पाळू शकत नाही.

बसथांब्यावर बस कोठे आहे, मार्गस्थ झाली का याची माहिती मिळावी. स्वच्छतागृह असावे. बसची वारंवारिता वाढवावी.
- चंद्रशेखर सोनवणे, प्रवासी

Web Title: PMP bus issue