पंचिंग पासबाबत निर्णय १३ जुलैपर्यंत घेऊ - गुंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे - विद्यार्थी, नोकरदार, फेरीवाले, विक्रेते आदी अल्पउत्पन्न गटातील नागरिकांना उपयुक्त ठरणारा पंचिंग पास तातडीने सुरू करावा, 
यासाठी सहा प्रवासी संघटनांनी पीएमपीकडे बुधवारी आग्रही मागणी केली. दरम्यान, याबाबत अभ्यास करून १३ जुलैपर्यंत निर्णय घेण्याचे आश्‍वासन पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी दिले आहे. 

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पंचिंग पास सवलत बंद केली. त्याविरोधात प्रवाशांनी आंदोलन केले. त्याची दखल घेऊन पीएमपीच्या संचालक मंडळाने पंचिंग पास सुरू करण्याचा निर्णय २३ मे रोजी घेतला आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे अल्पउत्पन्न गटातील नागरिकांची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यामुळे पीएमपी प्रवासी मंच, जनवादी महिला आघाडी, आम आदमी पार्टी, सजग नागरिक मंच, जाणीव, नागरिक चेतना मंच, कष्टकरी संघर्ष महासंघ आदींच्या प्रतिनिधींनी गुंडे यांची पीएमपीमध्ये भेट घेतली. पंचिंग पास ही आवश्‍यक सवलत आहे. ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रतिनिधींमध्ये मारुती भापकर, जुगल राठी, आशा शिंदे, सरस्वती भंडगिरे, के. एम. बोर्गे, किशोर मुजुमदार, बंडू पाटील, सुहास पवार, विवेक वेलणकर, संजय शितोळे आदींचा समावेश होता.

Web Title: PMP Bus Punching Pass Decission nayna Gunde