चालकाविना धावली पीएमपी बस 

Bus-Pune
Bus-Pune

खडकवासला - रस्त्यावर पीएमपी उभी होती. गाडीत चालक नसताना आणि अचानक बस सुरू झाली रस्ताने धावू लागली… अन मुख्य चौकात आली आणि तिने मोटारीला धडक दिली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. ही घटना बुधवारी संध्याकाळी खडकवासला धरण चौकात घडली. 

पीएमपीची कात्रज ते खडकवासला अशी बससेवा आहे. शेवटचा बसथांबा असल्याने ती बस खडकवासला धरण चौकात दररोज थांबते. तशी आज संध्याकाळी पाउणे सहा वाजता आली.

जिल्हा परिषद शाळेच्या मागे उतारावर थांबली होती. चालक- वाहक बस मधून उतरून बाहेर आले होते. बस मध्ये कोणी नव्हते. तरी बस अचानक सुरू झाली आणि शंभर दोनशे मीटर रस्त्याने धावली. आणि खडकवासला धरण चौकात आली.  पुणे पानशेत असा रस्ता आहे या चौकातून एनडीएकडे जाणारा रस्ता आहे. तेथे पानशेत व पुण्याकडे जाणारे प्रवाशी उभे असतात. एनडीएकडे जाणाऱ्या रिक्षा थांबा आहे. शेजारी पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे त्याच्या शेजारी कालवा आहे. सुदैवाने यावेळी कोणी पायी जाणारे प्रवाशी, दुचाकीवरून जाणारे कोणी नव्हते. पण तेवढ्यात पानशेत बाजुने पुण्याकडे जाणारी मोटार चौकात आली. ही पीएमपी त्या मोटारीला जाऊन धडकली. आतील लोक जखमी झाले नाही. परंतु त्या मोटारीचे नुकसान झाले आणि पीएमपी तेथेच थांबली. यावेळी, चालक वाहक व परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी मोटारीतील लोकांना बाहेर काढले. याबाबत, मोटार चालकाने हवेली पोलिसात तक्रार देण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com