लोहगाव विमानतळावरून पीएमपीची बससेवा सुरू होणार 

लोहगाव विमानतळावरून पीएमपीची बससेवा सुरू होणार 

पुणे- लोहगाव विमानतळावरून 5 मार्गांवर पीएमपीच्या एसी-ई बससेवेला येत्या शुक्रवारपासून (ता. 23) सुरवात होणार आहे. त्यासाठी 34 ई- बस असून, दर अर्ध्या तासाला या बस प्रवाशांना उपलब्ध असतील. 

लोहगाव विमानतळाच्या आवारात शुक्रवारी सकाळी दहाला खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झेंडा दाखवून विमानतळ बससेवेला प्रारंभ होणार आहे. विमानतळाचे संचालक कुलदीपसिंगही या प्रसंगी उपस्थित असतील. विमानतळाच्या आवारात दोन बस प्रवाशांसाठी उभ्या असतील. तसेच विमान प्रवाशांना या बससेवेची माहिती व्हावी, यासाठी विमानतळ इमारतीमध्ये प्रवासी ज्या गेटमधून बाहेर पडतात, तेथे एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. त्यात बससेवेचे तपशील असतील. तसेच विमानतळाच्या आवारात सहा ठिकाणी इंग्रजी आणि मराठी भाषेत फ्लेक्‍स लावण्यात येणार आहेत. त्यावरही बसचे मार्ग आणि उपलब्ध बससेवा, याबद्दल माहिती असेल. पाच मार्गांसाठी अंतरानुसार प्रवाशांकडून 50, 100 आणि 150 रुपये प्रती व्यक्ती प्रवास भाडे असेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बसमध्ये प्रवाशांच्या बॅगा ठेवण्यासाठी पुरेशी जागा असेल. तसेच प्रत्येक फेरीनंतर बसचे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. बसमध्येही सॅनिटायझर असेल. विमानतळ सेवेच्या बस प्रवासाची माहिती पीएमपीएमएलच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असेल, असे पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी सांगितले. विमानतळावर प्रवाशांच्या मदतीसाठी पीएमपीचे दोन अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. विमानांच्या वेळापत्रकानुसार बसचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यासाठी विमानतळ आणि पीएमपी यांच्यात समन्वय राहण्यासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विमानतळापासून या मार्गांवर बससेवा 
- नगररस्ता, चंदननगर, मगरपट्टा, हडपसर 
- कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, वाडिया कॉलेज, पुणे स्टेशन, सेव्हन लव्हज चौक आणि स्वारगेट 
- पुणे स्टेशन, महापालिका, डेक्कन, कोथरूड 
- पुणे स्टेशन, शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ, बाणेर रोड, वाकड पूल, हिंजवडी 
- विश्रांतवाडी, आळंदी रस्ता, भोसरी, नाशिक फाटा, पिंपरी, निगडी 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com